November 26, 2011

पुजारी

वाटलं एकदा . . . मशीन सोडून
पुस्तक कवितांच . . .  हाती धरावं

हळुवार भावना , तरल विचार
असलं काहीतरी असतं म्हणे

एकदा जरा करून पहावं

पण नाही . . .

कविता प्रेमाच्या वाचून सुद्धा
स्वप्नात न्युटनच आला आहे
इंजिनीयरिंगच्या चार वर्षात
पुरता गोंधळ त्याने घातला आहे ..

वेगवेगळ्या नावांनी येथे
एकाच समीकरण लिहिले आहे
सोप्या गोष्टी अवघड करण्याचे
शास्त्र आम्हाला शिकवले आहे

बाण झेलण्याचे वय आमचं
व्हेक्टर्सचे बाण काढण्यात गेलं आहे
नदीत पाय टाकून बसायचं  वय आमचं
M3 चे पाय धरण्यात गेलं आहे

तरीही हर मानू नका मित्रांनो

एवढी चार वर्ष संपू द्यात
निकाल तुमचाही लागणारच आहे

कारण . .

प्रत्येक दगडाची पूजा करायला
पुजारी येथे नेमलाच आहे . .