February 26, 2011

गेल्या आठवड्यात एक शाळेतल्या मित्राचा फोन आला होता. त्याचा चेहरा माला पुसटसा आठवत होता. आज 
इतक्या वर्षांनी आणि तेहि फोनवरून आम्ही बोलत होतो पण त्या २० / २५ मिनिटात मला तो परत मागे घेवून 
गेला. 

झाल्या गप्पा मोजक्याच "तू कुठे , मी कुठे अशा" ... पण तो नक्की कोण हे आठवण्याच्या प्रयत्नात मी परत 
एकदा शाळेत जाऊन आलो. आज शाळा सुटून १८ वर्षे झाली पण शाळेच्या काही आठवणी खूप ताज्या आहेत. 
अर्थात , प्रत्येकाच्याच असतात त्या. शाळेतले मित्र भेटल्यावर सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे नाव 
आठवण्याची. चेहरा अगदी सहज आठवतो, नाव हुलकावणी देत राहते. अगदी अर्धा तास बोलून झाल्यावर 
देखील शेजारच्याला विचारावे लागते , आता गेला त्याचे नाव काय रे ?

कोण कुठे जाईल आणि नंतर कोठे भेटेल सांगता येत नाही. शाळेत फारसे माहित नसलेले किंवा फारशी दोस्ती नसलेले लोक नंतर कदाचित खास मित्र होतात ..

निर्व्याज आणि निरपेक्षतेने झालेली अशी शाळेतली मैत्री मात्र खूप आनंद देते ..  

No comments:

Post a Comment