May 17, 2011

बेरजा वजाबाक्या करताना मनात धरलेल्या आकड्याला हातचा का म्हणतात माहित नाही . . .  . कदाचित राखून ठेवलेला आकडा म्हणून म्हणत असावेत. हातचा आकडा हिशेबाला चांगला असतो पण हातच्या राखून ठेवलेल्या इतर गोष्टी मात्र बेरजेपेक्ष्या वजाबाक्याच जास्त करतात. 


अव्यक्त आनंद , दाद , कल्पना , शब्द , आश्चर्य , उत्सुकता आणि अश्रू ...... तुमचे अंतर वाढवत जातात. अर्थात, 
इतका मोकळेपणा यायला "पण", "तरी" अशा शब्दांशी दुष्मनी करावी लागते. किती वेळा आपण 
मनापासून दुसऱ्याचे कौतुक करतो ? स्वतःशी तुलना, परिस्थितीशी तुलना, भूतकाळाशी तुलना या सगळ्यांचे       
अडथळे दूर झाले कि मग कुठे दुसऱ्याचे कर्तृत्व दिसतं . . . .  

चलो दिल्ली सिनेमात, विनय पाठक एक खूप छान वाक्य बोलतो -- " बहेनजी , आपका तो गुड भी "नॉट बेड" से शुरू होता है .. "

निर्मळ मनान फक्त समोरची गोष्ट आवडली म्हणून लगेच तसं दाखवण सोप नाही. "आहे मनोहर " नंतर "तरी" हा येतोच. तुलना हा कौतुकाचा एक अविभाज्य भाग आहे फक्त ती करू नये अशी अपेक्षा कायम दुसऱ्याकडून ठेवलेली असते.
 


No comments:

Post a Comment