एकच झुंबड उडते . . .
कुणीतरी दोघे
मागेपुढे उभे राहतात . .
कुणीतरी दोघे
एकमेकांशी बोलतात . .
कधी शब्दांनी
कधी हालचालींनी . .
तरीही त्यांची ओळख होते
एक अस्पष्ट रेष ओढली जाते
या असंख्य ठिपक्यांच्या रांगोळीत . .
जिथं
कोणतेही दोन ठिपके
जुळू शकतात
अंतरांच्या अपरोक्ष . .
आणि
सजते हि
ठिपक्यांची रांगोळी
माणसांच्या रंगात . . .
No comments:
Post a Comment