रोजच्या धकाधकीत आपण अनेक लोकांना भेटतो, नवीन मित्र बनवतो. प्रत्येकाशी नकळत एक समीकरण जमवण्याचा प्रयत्न होतो. कधी जमतो ... कधी चुकतो. आपण समोरच्यात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो.
जे लोक आपल्या इच्छेप्रमाणे वागतात ते निश्चितच आवडतात पण जे वागत नाहीत ते आवडत नाहीत असे होत नाही. कधीतरी आपणही तसेच वागल्याच आठवते.
आसमंतात या शोधू चला
एकमेकांना .......
सापडाल तुम्हीच
दुसऱ्यातले तुम्हाला . . ..
ओळखीच्या चेहऱ्यातले
अनोळखी भाव
अनोळखी चेहऱ्यातले
ओळखीचे भाव
आपला ... दुजा ठरवावयाचे
गणित असते काय ?
जिथे जुळले सूर ... आणिक
संवादी मनाला वाव
तिथे जुळती नाती आणि
उणे असे काय ?
No comments:
Post a Comment