October 01, 2011

पाणी

पाण्याकडे फक्त पाणी म्हणून पहिले तर त्यात दुसरे काहीच दिसत नाही ... पण त्याच पाण्याला थोड्या रसिकतेने पहिले तर त्यात दवबिंदू दिसतात, तुषार दिसतात. तेच पाणी शुभ्र धबधबा दाखवते 
अन निळ्या आकाशेचे प्रतिबिंब पण दाखवते. स्वतःचे रूप, आकार आणि रंग नसून सुद्धा सौंदर्य दाखवणारे
पाणी हे कदाचित एकमेव असावे. 

दृश्य आणि अनुभूत यातला फरक फक्त पाणी दाखवू शकते. पावसाच्या पाण्याने ओले झालेले पान प्रकाशाने चमकते तेव्हा मोत्याचा भास होतो. हे दृश्य सगळ्यांना दिसते पण त्यातले मोती अनुभवले तर त्याची मजा काही औरच.




 स्तब्ध पाण्यात खालचा खडक पण दिसतो आणि तीरावरच्या झाडाचे प्रतिबिंब पण दिसते. आपले अस्तित्व विसरून भोवतालच्या जगाशी एकरूप होण्याची असाधारण प्रतिभा पाण्यात आहे .... जी कदाचित माणसाला कधीच जमणार नाही .... 
  

1 comment: