October 01, 2011

प्यादे

बुद्धी आणि मन
यात एकदा भांडण झालं

श्रेष्ठ कोण ठरतंच नव्हत ...

भांडणासाठी मग
बुद्धिबळाचा डाव मांडला

मोहरे ते स्वतःच होते
गरज होती प्याद्यांची

मनाने डोळ्यांची निवड केली
बुद्धीने ओठांना जवळ केलं . . .

डाव रंगत गेला
भावनेची रस्सीखेच सुरु झाली

चेक्मेटचा क्षण आला तेव्हा  . . .

ओठांनी स्वतःला शिवून घेतलं
डोळे मात्र सगळ बोलून गेले

बुद्धिबळाच्या डावात . . . दोघांचे प्यादे जिंकले
मोहरे मात्र . . . हरले

No comments:

Post a Comment