October 02, 2011

शीर्षक

निरीक्षण आणि कल्पना यांचे अफलातून मिश्रण होवून जी भावना प्रतीत होते ,  ती म्हणजे कविता . .


शीर्षक म्हणाले कवितेला 
मी सुंदर असेल तरच 
लोक तुला वाचतील
माझे सौंदर्यच . .  तुला पावती देईल 

उत्तरादाखल कविता म्हणाली 
तू एक शब्दाचा 
एक दिवसाचा आहेस 

मी दहा ओळींची 
आयुष्यभराची आहे 

तुला न पाहता 
जो मला वाचेल 
तो माणसाचे अंतरंग शोधेल 
त्यावर प्रेम करेल 

चिरंतन करेल . . .



No comments:

Post a Comment