चुकांनी त्रासलेले दिवस
विस्मृतीच्या दाराकडे पळतात
चुका स्वीकारण्याची ताकद
स्वतःबरोबर नेवू पाहतात
अशा पळणाऱ्या दिवसांना
सरगाठीने बांधून ठेवावं
एखाद्या शांत क्षणी
सरगाठ सोडून . . चुकांना हसावं . .
हसण्यातून आपल्या
चुकांशी दोस्ती करावी
सरगाठ पुन्हा बांधून
पुढच्या शांत क्षणाची वाट पहावी . .
No comments:
Post a Comment