पाहून स्वप्नात कल्पतरूला
इच्छांचा डोंब उसळला
जोडलेले पाहून हात
"तथास्तु" मीच असे उच्चारला . . .
म्हणे स्वर्गात त्याच्या
प्रवेश दुखा:ला नव्हता
असे प्रयत्नांती जो परमेश्वर
शेजारीच तयाच्या होता . . .
प्रस्तावना करून एवढी
मागणी हलकेच आली
अनुभवण्या अपूर्णता इथली
पासपोर्टची सोय हवी
No comments:
Post a Comment