झाडाचं फुल परडीत बसतं
गुंफले जाण्याच्या प्रतीक्षेत
शेजार कुणास न ठावूक
भाग्य स्त्रग्धरेच्या हातात
रंग खुलवतात फुलं
धाग्याच्या सहवासात
लपवून टाकतात सौंदर्यात
त्यांच्यातील बंधनास
अदृश्य बिचारा धागा
खिजगणतीत ना कुणाच्या
कोमेजाल्यावरच दिसू लागतो
तो आधार निर्माल्याचा . . .
गुंफले जाण्याच्या प्रतीक्षेत
शेजार कुणास न ठावूक
भाग्य स्त्रग्धरेच्या हातात
रंग खुलवतात फुलं
धाग्याच्या सहवासात
लपवून टाकतात सौंदर्यात
त्यांच्यातील बंधनास
अदृश्य बिचारा धागा
खिजगणतीत ना कुणाच्या
कोमेजाल्यावरच दिसू लागतो
तो आधार निर्माल्याचा . . .
No comments:
Post a Comment