October 02, 2011

माती

तुमच्या आमच्या सारखे
हजार . .  जातात येतात
रस्त्याला ती जाणीव नसते

दाखल तुमची
माती घेते
थोड्या काळ का होईना
पाऊलखुणा तुमच्या जपते

नाते ते
तुम्हालाही टिकवायचे असेल तर
मातीला त्या आठवावे लागते
वारा तिला भेटण्या अगोदर
तुम्हालाच तिला भेटावे लागते

No comments:

Post a Comment