घड्याळात एकदा बारा वाजले
तिन्ही काटे एकच जागी उभे राहिले
मोठेपणाचे भांडण त्यांचे
आज नव्याने रंगले
एका जागी उभे राहून
दोन दिशांना पाहू लागले
एकाच्या ओठावर विचार होता
मिनिटा मिनिटांचा तर तास होता
दुसरा चिडून म्हणत होता
मिनिटा मिनिटांचा एकच तास होता
गदारोळात त्या सेकंद काटा मात्र अबोल होता
धक्काबुक्कीने दोघांच्या खाली तो पडला होता
आता मात्र दोघांना घाम फुटला
अहो, तास काय नि मिनिट काय
पुढचा क्षणच येईनासा झाला
अबोल असलेला सेकंद काटा
आता हळूच बोलू लागला
आयुष्यातली वेळ आपली
तास मिनिटात मोजू नये
अनमोल क्षणांचा राजा मी
सेकंद काटा कधी विसरू नये
तिन्ही काटे एकच जागी उभे राहिले
मोठेपणाचे भांडण त्यांचे
आज नव्याने रंगले
एका जागी उभे राहून
दोन दिशांना पाहू लागले
एकाच्या ओठावर विचार होता
मिनिटा मिनिटांचा तर तास होता
दुसरा चिडून म्हणत होता
मिनिटा मिनिटांचा एकच तास होता
गदारोळात त्या सेकंद काटा मात्र अबोल होता
धक्काबुक्कीने दोघांच्या खाली तो पडला होता
आता मात्र दोघांना घाम फुटला
अहो, तास काय नि मिनिट काय
पुढचा क्षणच येईनासा झाला
अबोल असलेला सेकंद काटा
आता हळूच बोलू लागला
आयुष्यातली वेळ आपली
तास मिनिटात मोजू नये
अनमोल क्षणांचा राजा मी
सेकंद काटा कधी विसरू नये
No comments:
Post a Comment