अर्थ शोधण्या समाधानाचा
स्वर्गात एकदा फिरत होतो
रांगेत उभे सगळे आत्मे होते
देह्वाटप त्यांना चालले होते
कुणी संपत्तीचा,
कुणी कीर्तीचा,
कुणी प्रसिद्धीचा
आग्रह देवाला करीत होता
बोलता बोलता एक आत्मा
मित्र अन समाधान मागू लागला
हसले सगळे आत्मे त्याला
देव देखील हरखून म्हणाला
संपत्ती माग, प्रसिद्धी माग
इतिहासात तुझे नाव होईल
पुतळे तुझे उभारले जातील
छद्मी हसला तो हे ऐकून
अन म्हणाला
पुतळे एकाकी उभे होते
इतिहासातच ते जगात होते
वर्तमान त्याला हवा
ऐकणाऱ्या त्याच्या ओठांना
कान तेथे असणार होते
समाधान त्याला देणार होते
हळूहळू देवाने वाटप तेथले संपवले
सगळे आत्मे पृथ्वीवर पाठवले
याला मात्र तेथेच ठेवला
आज देवाला एक मित्र भेटला . . .
स्वर्गात एकदा फिरत होतो
रांगेत उभे सगळे आत्मे होते
देह्वाटप त्यांना चालले होते
कुणी संपत्तीचा,
कुणी कीर्तीचा,
कुणी प्रसिद्धीचा
आग्रह देवाला करीत होता
बोलता बोलता एक आत्मा
मित्र अन समाधान मागू लागला
हसले सगळे आत्मे त्याला
देव देखील हरखून म्हणाला
संपत्ती माग, प्रसिद्धी माग
इतिहासात तुझे नाव होईल
पुतळे तुझे उभारले जातील
छद्मी हसला तो हे ऐकून
अन म्हणाला
पुतळे एकाकी उभे होते
इतिहासातच ते जगात होते
वर्तमान त्याला हवा
ऐकणाऱ्या त्याच्या ओठांना
कान तेथे असणार होते
समाधान त्याला देणार होते
हळूहळू देवाने वाटप तेथले संपवले
सगळे आत्मे पृथ्वीवर पाठवले
याला मात्र तेथेच ठेवला
आज देवाला एक मित्र भेटला . . .
No comments:
Post a Comment