October 02, 2011

दुसरा

श्वास आणि हुंकार
नाण्याच्या दोन बाजू आहेत
श्वास गरज आहे
तर हुंकार गरजेचा आहे

श्वास हर एक
क्षणाचा मित्र आहे
तर हुंकार
क्षणिक मित्र आहे

श्वास रोजचाच असतो
दुर्लक्षित राहतो
हुंकार कधीतरी येतो
अन . . भाव खावून जातो

मात्र
श्वास असेल तरच
हुंकार येवू शकतो

दुसरा दुसरा आहे
म्हणूनच
पहिल्याला पहिला असल्याचा
आनंद आहे . . . 

No comments:

Post a Comment