डोंगराच्या कुशीत वसलेलं पाणी
जिथं रानपाखर गातात गाणी
चित्रकार तो निसर्ग तेथला
खजिना त्याने असे लुटवला
पावती देण्या त्या सौंदर्याची
शब्द मी शोधू लागलो
निसर्गाशी तेथल्या
संवाद मी साधू लागलो
मोजकेच बोल . . तोही असे बोलला
जोड या रम्यतेला
निरवतेची येथे आहे
तेवढी तू
घालवू नकोस
चार लोकात महती गाऊन
टुरीस्ट सेंटर माझे बनू नकोस . . . .

No comments:
Post a Comment