इतिहास शोधतो आपण
अस्पष्ट ओरखड्यांच्या शिलालेखात
पाचोळा झालेल्या पोथ्यात
विजेत्यांनी लिहिलेल्या कथात
सत्य गुदमरते
मागे राहते . . . कुठेतरी
पराभूत मनात
इतिहास सप्रमाण सिद्ध होतो
सत्य अस्फुटच
पराभुतांचे !
अस्पष्ट ओरखड्यांच्या शिलालेखात
पाचोळा झालेल्या पोथ्यात
विजेत्यांनी लिहिलेल्या कथात
सत्य गुदमरते
मागे राहते . . . कुठेतरी
पराभूत मनात
इतिहास सप्रमाण सिद्ध होतो
सत्य अस्फुटच
पराभुतांचे !
No comments:
Post a Comment