एक कन्फेशन बॉक्स असावा . . . .
कधी बोलायला
कधी मौनाला
खूप थोडं सांगूनही
बरचं काही समजायला
एक कन्फेशन बॉक्स असावा . . . .
अर्थ न काढता
अर्थ न लावता
कान फक्त उघडे ठेऊन
शब्द ऐकणारा असावा
एक कन्फेशन बॉक्स असावा . . . .
विश्वासाचा पुतळा असावा
विरंगुळा त्याचा मीच असावा
आणि एक छोटा हट्ट
जमल्यास . . . . माणूसच असावा ....
No comments:
Post a Comment