November 26, 2011

गुलमोहर

गुलमोहराच्या पाकळीत
रंग कसे डौलदार दिसतात

स्वतःचा वेगळेपणा दाखवत
इतरांशी जमवून घेतात

प्रत्येक छटा मोहक असते
सीमारेषा त्यांना माहीतच नसते

त्या रंगसाराखीच तू
जीवनात मिसळून जा

राखून अस्तित्व तुझे
माझ्यात रंगून जा 

No comments:

Post a Comment